७ हजार रुपयांची लाच घेताना बुलढाणा बस आगाराच्या डेपो मॅनेजरवर लाचलुचपत विभागाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2023 17:52 IST2023-08-22T17:52:06+5:302023-08-22T17:52:14+5:30
बुलढाणा डेपो मॅनेजरला सात हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.

७ हजार रुपयांची लाच घेताना बुलढाणा बस आगाराच्या डेपो मॅनेजरवर लाचलुचपत विभागाची कारवाई
बुलढाणा डेपो मॅनेजरला सात हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. बुलढाणा डेपो मॅनेजर संतोष वानेरे यांनी एका चाळीस वर्षीय एसटी महामंडळ कर्मचाऱ्याकडून पंढरपूरला जात असताना एसटीमध्ये स्टोव पेटवून स्वयंपाक केल्यामुळे कारवाई न करण्यासाठी एसटी महामंडळात नोकरीवर असलेल्या आपल्या मावस भाऊ महादेव सावरकर यांच्या माध्यमातून या कर्मचाऱ्याकडे तब्येत 40 हजार रुपयाची लाचेची मागणी केली होती. तडजोड अंति पस्तीस हजार रुपये देण्याचे ठरले होते.
यापैकी तब्बल 28000 रुपये यापूर्वीच आरोपींनी फिर्यादी कडून घेतले होते. मात्र उर्वरित सात हजार रुपये देण्यासाठी या फिर्यादीला आरोपीकडून त्रास दिला जात होता. त्यामुळे कंटाळून त्याने आपली कैफियत लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा कडे नोंदवल्यानंतर काल संध्याकाळी खामगाव रोडवरील संत तुकाराम पतसंस्थेजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. काल लाचलुचप प्रतिबंधक विभाग बुलढाणा ने रंगेहात पकडले. शहरातील खामगाव रोडवर काल रात्री दोघांना लाच स्वीकारत असताना रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदाराकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर सापळारचून यशस्वीरित्या ही कारवाई करण्यात आली.