शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

ऐतिहासिक स्थळांच्या कामांना ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 2:18 PM

ठेकेदाराकडे असलेले दीडशे कारागीर काम बंद करुन दहा दिवसापूर्वी गावाकडे निघून गेले. पर्यटन विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे विकास कामाला खीळ बसली.

- काशिनाथ मेहेत्रे लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा: राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा ऐतीहासीक शहराचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास व्हावा या हेतुने ३११ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजुर करण्यात आला. त्यापैकी साडेबारा कोटी रुपयांची कामे अकरा महिन्या पासून युध्द पातळीवर सुरु झाली. मात्र संबंधित ठेकेदाराला आजपर्यंत पैसे मिळाले नाही. त्यामुळे ठेकेदाराचे दीडशे कारागीर काम सोडून निघुन गेल्याने शहर विकास आराखड्यातील कामे रखडली आहेत.सिंदखेड राजा विकास आराखडा आघाडी शासनाच्या कार्यकाळात मंजुर करण्यात आला होता. या आराखड्यासाठी ३११ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यासाठी खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सतत पाठपुरावा केला. महाराष्ट्र शासनाने साडेबारा कोटी व केंद्र शासनाने साडेबारा कोटी रुपयांचा पहिला हप्ता देण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, खासदार जाधव आ. डॉ. खेडेकर व मान्यवरांच्या हस्ते कामाचा शुभारंभ देखील झाला. २० जुलै २०१८ रोजी ठेकेदाराला वर्क आॅर्डर देण्यात आली. ठेकेदाराने कर्नाटक राज्यातून कोदवा दगड आयात केला. लातुर, नांदेड, कर्नाटक राज्यातील दीडशे कुशल कारागीर आणले.अकरा महिन्यापासून युध्दपातळीवर कामाला सुरवात देखील केली. लखोजीराव जाधवांचा राजवाडा, रंगमहाल, सावकार वाडा, नीळकंठेश्वर मंदीर व काळाकोट भुईकोट किल्लयातील कामाचा समावेश होता. अकरा महीने झाले तरीही शासनाने ठेकेदाराला पैसे दिले नाही.नागपूर पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विराग सोनटक्के यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे वेळोवेळी निधीची मागणी केली. जिल्हाधिकारी यांनी व आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी पर्यटन विभागाकडे निधीसाठी पाठपुरावा केला. परंतु आजपर्यंत निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे नाईलाजाने ठेकेदाराकडे असलेले दीडशे कारागीर काम बंद करुन दहा दिवसापूर्वी गावाकडे निघून गेले. पर्यटन विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे विकास कामाला खीळ बसली. विकास आराखड्यातील निधी त्वरीत उपलब्ध करुन पर्यटनाला चालना मिळावी अशी मागणी पर्यटकांनी केली.सिंदखेडराजा हे ऐतिहासिक शहर आहे. मोठ्या संख्येने पर्यटक शहराला भेट देतात. येथील पर्यटन स्थळांचा विकास करण्याची आवश्यकता आहे. पर्यटन विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शासनाने निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी नागरिक व पर्यटक करीत आहेत.निधी उपलब्ध न झाल्यामुळे व पाणीटंचाई असल्यामुळे कामे बंद पडली. निधी उपलब्ध होताच कामे सुरु करु.-डॉ .विराग सोनटक्केसहाय्यक संचालकपुरातत्व विभाग, नागपूर

टॅग्स :buldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजा