धांदरवाडीमध्ये धाडसी चोरी, २.५० लाखांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:23 IST2021-07-09T04:23:12+5:302021-07-09T04:23:12+5:30

दरम्यान, चोरी झाल्याचा प्रकार ७ जुलै रोजी शिंदे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. प्रकरणी ...

Brave theft in Dhandarwadi, 2.50 lakh items stolen | धांदरवाडीमध्ये धाडसी चोरी, २.५० लाखांचा मुद्देमाल लंपास

धांदरवाडीमध्ये धाडसी चोरी, २.५० लाखांचा मुद्देमाल लंपास

दरम्यान, चोरी झाल्याचा प्रकार ७ जुलै रोजी शिंदे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. प्रकरणी ८ जुलै रोजी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र चोरट्यांचा माग काढण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही.

सिंदखेड राजा तालुक्यातील धांदरवाडी येथील विलास संजय शिंदे यांचे सिंदखेड राजा येथे संगणक व मोबाईल दुरुस्तीचे दुकान आहे. त्यांनी दुकानातील वस्तूचे खरेदी-विक्रीचे पैसे व सोन्या-चांदीचे दागिने पेटीमध्ये ठेवले होते. चोरी झाली त्या दिवशी विलास शिंदे यांचे आई-वडील कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. ७ जुलै रोजी मोबाईल ऑर्डरचे पैसे देण्यासाठी पेटीजवळ गेले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आहे. पेटीमधील दीड लाख रुपये रोख, १० ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, सात ग्रॅम वजनाची आणखी एक अंगठी व अन्य साहित्य असा २.५० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरट्यांनी घराचे टिनपत्रे उचकटून घरात प्रवेश करीत ही चोरी केली. ही घटना धांदरवाडी येथेच घडली. धांदरवाडी येथे दिवसा ही चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड राजा पोलीस करीत आहेत.

Web Title: Brave theft in Dhandarwadi, 2.50 lakh items stolen