विहिरीत पडून मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:21 IST2017-09-30T00:21:10+5:302017-09-30T00:21:21+5:30
डोणगाव : डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या ग्राम अकोला ठाकरे येथील विनोद गजानन काळे (१२) हा बालक विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला असता पाय घसरून विहिरीत पडला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली.

विहिरीत पडून मुलाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव : डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या ग्राम अकोला ठाकरे येथील विनोद गजानन काळे (१२) हा बालक विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला असता पाय घसरून विहिरीत पडला. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली.
सखाराम भिकाजी गव्हाणे यांच्याजवळ त्यांचा नातू विनोद गजानन काळे हा लहानपणापासूनच आईसह आजी- आजोबाजवळ राहत होता. २९ सप्टेंबरच्या दुपारी २ वाजताच्या दरम्यान शेतात विहिरीवरून पाणी आणण्यासाठी गेला असता विहिरीत पाय घसरून पडला व यातच त्याचा मृत्यू झाला. पाणी आणण्यासाठी गेलेला विनोद परत का आला नाही, याचा शोध घेत घेत सर्वजण विहिरीवर आले असता, विनोद विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर गावकर्यांनी विहिरीत गळ टाकून विनोदचा मृतदेह बाहेर काढला.
याप्रकरणी डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये विनोदचे आजोबा सखाराम भिकाजी गव्हाणे यांनी फिर्याद दिली.
यापूर्वी मलकापूर पांग्रा येथील नवविवाहिता माधुरी कृष्णा जाधव (वय १९ वर्षे) यांचा २६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाज ताच्या दरम्यान विहिरीवर पाणी भरायला गेली असता तोल जाऊन विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.