बैल धुण्यासाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

By Admin | Updated: September 2, 2016 01:49 IST2016-09-02T01:49:37+5:302016-09-02T01:49:37+5:30

चिखली तालुक्यातील घटना; मेरा बु. येथे शोककळा.

The boy who went to wash the bull was drowned in water | बैल धुण्यासाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

बैल धुण्यासाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

चिखली (जि.बुलडाणा), दि. १: पोळा सणाप्रित्यर्थ बैल धुण्यासाठी तलावावर गेलेल्या गौतम शांताराम पैठणे (१0)या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील मेरा बु. या गावामध्ये ऐन पोळय़ाच्या दिवशी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. तालुक्यातील मेरा बु. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चवथीमध्ये शिकत असलेला गौतम पैठणे हा त्यांचे वडिल शांताराम पैठणे यांच्यासमवेत गावाजवळील बेलदरी कट्टा नामक गावतलावात पोळानिमित्त बैलधुण्यासाठी गेला होता. दरम्यान बैल धुत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. ही दु:खद वार्ता गावात कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

Web Title: The boy who went to wash the bull was drowned in water