दुचाकीच्या धडकेत मुलगा ठार
By Admin | Updated: September 26, 2014 00:22 IST2014-09-26T00:15:54+5:302014-09-26T00:22:41+5:30
दुचाकीच्या झालेल्या धडकेत १५ वर्षीय मुलगा ठार तर त्याचे मोठेवडील गंभीर जखमी.

दुचाकीच्या धडकेत मुलगा ठार
संग्रामपूर : दुचाकीच्या झालेल्या धडकेत १५ वर्षीय मुलगा ठार तर त्याचे मोठेवडील गंभीर जखमी झाले. ही घटना आज दुपारी १ वाजताच्या सुमारास पातुर्डा फाट्या दरम्यान घडली. खिरोडा येथील रोहित श्यामराव दाणे (वय १५) हा त्याचे मोठे वडिलांसोबत मोटारसायकलने खिरोडा येथे येत होता. तर पातुर्डा दिशेने विनोद गोवर्धन टकले रा. शेलोडी ता.खामगाव हा मोटारसायकलने पातुर्डा येथे जात असताना दोघांची जबर धडक झाली. यामध्ये रोहित श्यामराव दाणे व त्याचे मोठेवडील हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यामुळे दोघांनाही अकोला येथे नेण्यात आले असता उपचार सुरु असताना रोहितचा मृत्यू झाला.