दुचाकीच्या धडकेत बालक जखमी
By Admin | Updated: August 28, 2015 00:18 IST2015-08-28T00:18:30+5:302015-08-28T00:18:30+5:30
मातोळा तालुक्यातील घटना.

दुचाकीच्या धडकेत बालक जखमी
मोताळा (जि. बुलडाणा): दुपारच्या सुटीत मध्यान्ह भोजन करून घरी येत असताना भरधाव दुचाकीच्या धडकेत विद्यार्थी जखमी झाल्याची घटना निमखेड-डोलखेड येथे मंगळवारच्या दुपारी घडली.
बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमखेड-डोलखेड (ता. मलकापूर) येथील जिल्हा परिषद मराठी शाळे तून दुपारच्या वेळी किरण कैलास सोनाने हा खिचडी खाऊन घराकडे येत असताना हृषीकेश बाळकृष्ण क्षीरसागर (रा. निमखेड-डोलखेड) याने त्याच्या ताब्यातील बजाज डिस्कव्हर दुचाकी भरधाव व निष्काळजी पणे चालवून त्यास ठोस मारून जखमी केले.
सोपान एकनाथ जाधव यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम २७९, ३३७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास नायक पोलीस कॉन्स्टेबल रविकांत बावस्कर करीत आहेत.