गोवंश हत्येप्रकरणी दोघांना अटक
By Admin | Updated: October 17, 2015 01:49 IST2015-10-17T01:49:12+5:302015-10-17T01:49:12+5:30
धामणगाव बढे येथील घटना ; गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई.

गोवंश हत्येप्रकरणी दोघांना अटक
धामणगाव बढे (जि. बुलडाणा): धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या माकोडी, ता. मोताळा येथे गोवंश हत्येप्रकरणी दोघांना १६ ऑक्टोंबर रोजी अटक करण्यात आली. पोलीसांना मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून घटनास्थळी मांस कापत असताना दोघांना रंगेहात पकडले. यामध्ये शे. शकील शे. बिस्मिल्ला, शे. नशिर शे. कदिर दोघेही रा. माकोडी यांना अटक केली. यावेळी त्यांच्याकडील पशूहत्येचे साहित्याचा पंचनामा करून ताब्यात घेतले. तर मृत पशूचा वैद्यकीय अहवाल घेण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जैस्वाल, मोताळा यांना बोलावून कार्यवाही करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार वानखेडे करीत आहे.