शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातामध्ये दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 11:00 IST

शेगाव रोडवर दुचाकींच्या झालेल्या दोन अपघातामध्ये दोन जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: मोताळा तालुक्यातील शेलापूर येथे व खामगाव नजीक शेगाव रोडवर दुचाकींच्या झालेल्या दोन अपघातामध्ये दोन जण ठार झाले असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. गेल्या २४ तासात हे अपघात झाले.पहिली घटना शेलापूर येथे घडली. जुन्या बसस्थानका जवळ दुचाकीला अपघात होऊन मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील दुचाकीवरील दोघांचा रात्री दहा वाजेच्या दरम्यान अपघात झाला. दाताळा येथील प्रकाश नारायण चौधरी (५६), संजय गोविंदा चौधरी(५२) हे दोघे दुचाकीने घराकडे परतीच्या वाटेवर होते. मलकापूर-बुलडाणा रस्त्यावर हा अपघात झाला. दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना मलकापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकाश चौधरी ह्यांना गंभीर मार लागला होता. त्यामुळे त्यांना जळगाव खांदेश येथे हलविण्यात आले. मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. शेगाव रोडवरील अपघातात युवक ठारखामगाव: शेगाव रोडवरील वरखेड येथील पीर बाबाच्या दर्ग्याचे दर्शन करून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वारास भरधाव टीप्परने जोरदार धडक दिली. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता घडली.मेहबूब नगर मधील रहिवासी शेख वसीम शेख इकबाल हा युवक मंगळवारी दुपारी वरखेड येथील पीर बाबाच्या दर्यावर दर्शनानिमित्त दुचाकीने गेला होता.दर्शन आटोपून तो दुचाकीने घरी परत येत असताना होता. दरम्यान, त्याचवेळी वरखेड फाट्यावरील वळणावर शेगावकडून गौण खनिज घेवून येणाºया भरधाव टिप्पर क्र. एमएच-३०- बीडी २९४४ ने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

 

टॅग्स :AccidentअपघातShegaonशेगावMalkapurमलकापूर