बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे दोन्ही आमदार निलंबित
By Admin | Updated: March 22, 2017 13:08 IST2017-03-22T13:08:57+5:302017-03-22T13:08:57+5:30
जिल्यातील काँग्रेसचे आमदार राहूल बोंद्रे व हर्षवर्धन सपकाळ यांना निलंबित करण्यात आले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे दोन्ही आमदार निलंबित
बुलडाणा : शेतकरी कर्जमाफीसाठी विधीमंडळात गदारोळ घातल्यामुळे जिल्यातील
काँग्रेसचे आमदार राहूल बोंद्रे व हर्षवर्धन सपकाळ यांना निलंबित करण्यात
आले आहे.
या सर्वांचं ३१ डिसेंबरपर्यंत निलंबन करण्यात यावं, असा प्रस्ताव संसदीय
कार्यमंत्री गिरीष बापट यांनी दिला. तो मान्य करण्यात आला. अर्थमंत्री
सुधीर मुनगंटीवार हे १८ मार्चला अर्थसंकल्प मांडत असताना, विरोधी
पक्षांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गदारोळ घातला होता. टाळ वाजवत
विरोधकांनी कर्जमाफीसाठी आग्रह धरला होता. सभागृहात गोंधळ घालणे, बॅनर
फडकावणे, घोषणाबाजी करणे, अवमान करणे, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे,
सभागृहाची प्रतिमा मलिन करणे, सभागृहाचे अवमान करणे असे आरोप ठेवून
दोन्ही आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे.