लाच घेणाऱ्या वीज अभियंत्यास तीन वर्षांची शिक्षा

By Admin | Updated: April 28, 2017 00:26 IST2017-04-28T00:26:40+5:302017-04-28T00:26:40+5:30

कनिष्ठ अभियंता शिवाजी शंकरराव जाधव यांना बुलडाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ एप्रिल रोजी सापळा रचून रंगेहात पकडले होते.

Borrowing power engineer, three years of education | लाच घेणाऱ्या वीज अभियंत्यास तीन वर्षांची शिक्षा

लाच घेणाऱ्या वीज अभियंत्यास तीन वर्षांची शिक्षा

लोणार : शेतामधील विहिरीवर विद्युत जोडणी देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी बिबी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळामध्ये कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंता शिवाजी शंकरराव जाधव यांना बुलडाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ एप्रिल रोजी सापळा रचून रंगेहात पकडले होते. सदरहू खटल्यामध्ये २७ एप्रिल रोजी अ.शा.कलोती विशेष न्यायालय मेहकर यांनी शिवाजी जाधव यांना १ वर्ष शिक्षा व ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा तसेच कलम १३ लाप्रका अपराधाखाली २ वर्ष शिक्षा व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने शिक्षा सुनावण्यात आली आहे.
लोणार तालुक्यातील बिबी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळामध्ये कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता शिवाजी शंकरराव जाधव हे शेतामधील विहिरीवर विद्युत कनेक्शन देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागत असल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे दिली होती. या तक्रारीवरून २६ एप्रिल रोजी सापळा रचून शिवाजी जाधव यांना ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वीज अभियंत्यास रंगेहात पकडले होते. सदरहू खटल्यामध्ये २७ एप्रिल रोजी अ.शा.कलोती विशेष न्यायालय मेहकर यांनी आरोपी अभियंता शिवाजी जाधव यास १ वर्ष शिक्षा व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने शिक्षा तसेच २ वर्ष शिक्षा व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सदरहू खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता अमोल बल्लाळ, सहा.सरकारी अभियोक्ता अ‍ॅड.आशिष केसाळे, अ‍ॅड.संतोष खत्री, अ‍ॅड.विनोद तायडे यांनी काम पहिले, तसेच बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक व्ही. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पो.हे.कॉं. विष्णू नेवरे, सुखदेव ठाकरे यांनी काम पाहिले.

Web Title: Borrowing power engineer, three years of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.