धनादेशाचा अनादर झाल्याने कर्जदारास कैद व दंड
By Admin | Updated: October 10, 2014 00:12 IST2014-10-10T00:12:21+5:302014-10-10T00:12:21+5:30
जळगाव जामोद येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने सुनावली सहा महिने कैद व दंडाची शिक्षा.

धनादेशाचा अनादर झाल्याने कर्जदारास कैद व दंड
जळगाव जामोद (बुलडाणा) : धनादेशाच्या अनादरप्रकरणी थकीत कर्जदाराला जळगाव जामोद येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी खानोरकर यांच्या न्यायालयाने सहा महिने साधी कैद व दंडाची शिक्षा सुनावली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील खेर्डे सोनगाव येथील उत्तम महारू पवार यांनी बुलडाणा अर्बनच्या जळगाव जामोद शाखेतून १२ डिसेंबर २00६ रोजी दोन लाख रुपये वैयक्तिक कर्ज घेतले होते. सुरुवातीस काही रक्कम भरल्यानंतर पुढे कर्ज खाते थकीत झाले. पतसंस्थेने उत्तम पवार यांच्याकडे कर्जाची मागणी केल्यावर त्यांनी जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या चाळीसगाव शाखेचा धनादेश शाखेत आणून दिला होता. मात्र, हा धनादेश वटला नाही त्यामुळे संस्थेने उत्तम पवार यांच्याविरूद्ध पोलिसांत तक्रार दिली होती. यावरून फौजदारी गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा निकाल न्यायदंडाधिकारी खानोरकर यांनी दिला. उत्तम महारू पवार यांना सहा महिने साधी कैद व १ लाख ७८ हजार रुपये धनादेश तसेच अतिरिक्त १ लाख २१ हजार १४0 रुपये दंड असे एकूण २ लाख ९0 हजार १४0 भरपाई आणि हा दंड न भरल्यास पुन्हा तीन महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.