भरधाव कार मिनीट्रकवर आदळली; १ ठार, २ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 13:33 IST2019-12-06T09:33:52+5:302019-12-06T13:33:13+5:30
गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास तालखेड फाटयानजीक भरघाव चारचाकी उभ्या ४०७ या मिनीट्रकवर आदळली.

भरधाव कार मिनीट्रकवर आदळली; १ ठार, २ जखमी
मलकापूर ः भरघाव चारचाकी कार उभ्या मिनीट्रकवर आदळून घडलेल्या अपघाता एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मलकापूर बुलढाणा रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री तालखेड फाट्यानजीक ही घटना घडली. यासंदर्भात अधिक माहिती अशी की,येथील माता महाकाली नगरातील चार तरुण मारुती ८०० या चार चाकीने बुलढाणा येथून मलकापूर कडे येत होते. गुरुवारी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास तालखेड फाटयानजीक भरघाव चारचाकी उभ्या ४०७ या मिनीट्रकवर आदळली. त्यामुळे घडलेल्या अपघातात केतन देविदास कंडारकर वय २५ रा.माता महाकाली नगर हा जागीच ठार झाला. तर सतिश सुकदेव बगाडे वय २४ व निलेश शंकर धाबे वय २६ दोघेही रा.माता महाकाली नगर मलकापूर गंभीर जखमी झाले आहेत. म्रुतक केतन कंडारकर हा एकुलता एक मुलगा त्यामुळे माता महाकाली नगरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. गंभीर जखमी सतिश बगाडे याला उपचारासाठी जळगाव खांदेश येथे हलविण्यात आले आहे. तर निलेश धाबे याच्यावर येथील मानस हाँस्पिटलात उपचार सुरू आहे. नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देवून जखमींना उपचारासाठी मलकापूर येथे हलविले.