हद्दवाढीत समावेशाबद्दल सदानंद नगरवासीयांकडून बोंद्रेंचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:35 IST2021-04-07T04:35:57+5:302021-04-07T04:35:57+5:30

सदानंद नगरमधील मारोती मंदिराजवळ आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गवते होते. सदानंद नगरचानगर पालिकेत समावेश व्हावा, यासाठी आम्ही सदानंदवासी कोणाकडेही ...

Bondre felicitated by Sadanand Nagar residents for inclusion in the boundary extension | हद्दवाढीत समावेशाबद्दल सदानंद नगरवासीयांकडून बोंद्रेंचा सत्कार

हद्दवाढीत समावेशाबद्दल सदानंद नगरवासीयांकडून बोंद्रेंचा सत्कार

सदानंद नगरमधील मारोती मंदिराजवळ आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गवते होते. सदानंद नगरचानगर पालिकेत समावेश व्हावा, यासाठी आम्ही सदानंदवासी कोणाकडेही आमच्या समस्या घेऊन गेलो नाही. त्यामुळे याचे श्रेय कोणीही घेण्याचा प्रयत्न करू नये, असे गवते यांनी स्पष्ट केले. तर सत्कारमूर्ती राहुल बोंद्रे यांनी सदानंदनगरवासीयांना न्याय मिळवून दिल्याचे समाधान व्यक्त करीत या सत्काराने भारावलो, असे स्पष्ट केले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अतहरोद्यीन काझी, राकाँ शहराध्यक्ष रवी तोडकर, शिवसेना शहरप्रमुख श्रीराम झोरे, न. प. गटनेता मो. आसीफ, डॉ. इसरार, अमिनखॉ उस्मानखॉ, न. प. सदस्य डॉ. प्रकाश शिंगणे, रफिक कुरेशी, विजय गाडेकर, राजू रज्जक, हाजी राउफ, विलास घोलप, शहेजाद अल्ली खान, अ‍ॅड. प्रशांत देशमुख, खलील बागवान, राहुल सवडतकर, नाजिम खान, सरपंच दिलीप लोखंडे, जावेद खान, पप्पू जागृत आदी पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. तत्पूर्वी सदानंदनगरवासीयांतर्फे फटाक्यांच्या आतषबाजीत राहुल बोंद्रेंचे स्वागत पार पडले.

Web Title: Bondre felicitated by Sadanand Nagar residents for inclusion in the boundary extension