‘कोण बनेल स्मार्ट’ स्पर्धेचे बक्षीस वितरण

By Admin | Updated: August 11, 2014 22:51 IST2014-08-11T22:51:20+5:302014-08-11T22:51:20+5:30

लोकमत बालविकास मंच : २0१४-१५ साठीची सदस्य नोंदणीला सुरुवात

'Bonanell Smart' competition prize distribution | ‘कोण बनेल स्मार्ट’ स्पर्धेचे बक्षीस वितरण

‘कोण बनेल स्मार्ट’ स्पर्धेचे बक्षीस वितरण

खामगाव : लोकमत बालविकास मंच व बुलडाणा अर्बन सहकारी पतसंस्था यांच्यावतीने घेण्यात आलेल्या कोण बनेल स्मार्ट ? या योजनेचे बक्षीस वितरण आज ११ ऑगस्ट रोजी स्थानिक श्री अग्रसेन पतसंस्थेच्या मुख्य शाखा सभागृहात उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बुलडाणा अर्बन सहकारी पतसंस्थेचे चेअरमन डॉ.सुकेश झंवर हे होते तसेच मंचावर बुलडाणा अर्बनचे संचालक दिनेश गांधी, माजी संचालक अंबालालजी गांधी, लोकमतचे कार्यालय प्रमुख अतुल पंचवाटकर, उपसंपादक गिरीश राऊत आदींची उपस्थिती होती. बाल मनाचा सच्चा सवंगडी लोकमत बाल विकास मंचव्दारा बालकांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. यासाठी बालमंच सदस्य नोंदणी करणे आवश्यक असते. गतवर्षी लोकमत व बुलडाणा अर्बन पतसंस्थेच्यावतीने ह्यकोण बनेल स्मार्ट? ह्ण ही प्रतियोगिता घेण्यात आली होती. या प्रतियोगितेमध्ये जिल्हाभरातील विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने सहभागी होवून प्रचंड असा प्रतिसाद दिला होता. या स्पर्धेची बक्षीस सोडत अकोला येथे काढण्यात येवून विजेते ठरविण्यात आले होते. यामधील खामगाव शहरातील विजेत्यांना बक्षीसांचे वितरण आज झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले. यामध्ये व्दितीय बक्षीस सायकल ओम उमेश गव्हाळे, सौरभ अरुण गोंड व प्रणव संजीव पुरवार, तिसरे बक्षीस कॉम्प्युटर टेबल प्रांजली राजेश गवई व साहिल उमराव जाधव, चौथे बक्षीस स्टडी टेबल राज प्रशांत राजपूत व भक्ती अनंतकुमार नेमाने या विद्यार्थ्यांना देण्यात आले. तसेच उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून २५ विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन लोकमत बालविकास मंच संयोजक योगेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकमतचे रणजीत देशमुख गणेश पिंपळकार, नाना हिवराळे, बुलडाणा अर्बनचे सचिन झंवर, रामेश्‍वर कोळसे, पंकज बराटे, मोहन कस्तुरे तसेच श्री अग्रसेन पतसंस्थेचे कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास उपस्थित राहू न शकलेल्या विजेत्या बाल मंच सदस्यांनी आपले बक्षीस बुलडाणा अर्बन पतसंस्था शाखा गांधी चौक खामगाव येथून आपले बक्षीस घेवून जावे.

Web Title: 'Bonanell Smart' competition prize distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.