युवकाचा मृतदेह आढळला

By Admin | Updated: October 5, 2014 01:02 IST2014-10-05T00:45:21+5:302014-10-05T01:02:50+5:30

अंढेरा परिसरातील शेतात आढळला युवकाचा मृत्यूदेह; आकस्मित मृत्यूची नोंद.

The body of the young man was found | युवकाचा मृतदेह आढळला

युवकाचा मृतदेह आढळला

अंढेरा (बुलडाणा) : येथील गणेश भानुदास सानप (१९) या युवकाचा मृतदेह आज ४ ऑक्टोबर रोजी दुपारी परिसरातील एका शेतात आढळून आला. शेतात जात आहे, असे सांगून गणेश सानप हा ३ ऑक्टोबर रोजी घरून निघाला होता; मात्र त्यानंतर तो परत न आल्यामुळे त्याचा परिसरात शोध घेण्यात आला. या दरम्यान आज दुपारी शिवारातील गावाचे सरपंच केशव नामदेव सानप यांच्या शे तात त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी केशव सानप यांच्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. गणेशच्या मृत्यूचे कारण अद्यापही समजले नसून, पोलिस तपास सुरू आहे.

Web Title: The body of the young man was found