अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 13:24 IST2019-05-16T13:24:09+5:302019-05-16T13:24:13+5:30
अभयारण्यात एका अनोळखी व्यक्तीचा फासावर लटकलेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली.

अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला
संग्रामपुर: सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले वसाळी या गावा पासुन एक किलोमीटर अंतरावर अभयारण्यात एका अनोळखी व्यक्तीचा फासावर लटकलेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना बुधवारी रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. अंबाबरवा अभयारण्यातील सोनबर्डी बीटमध्ये एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सागाच्या झाडाला गळफास लाऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती वन्यजीव विभागाचे कर्मचारी तथा वसाळी येथील पोलीस पाटील यांनी सोनाळा पोलिस स्टेशनला दिली. ठाणेदार अमर चोरे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेहाला शवविच्छेदनासाठी शेगाव येथे नेण्यात आले. सदर घटना तीन ते चार दिवसांपूर्वी झाली असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. यासंबंधी फिर्याद वसाडी येथील पोलीस पाटील जुम्मा पालकर यांनी सोनाळा पोलिस स्टेशनला दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चा सुरू आहेत.