The body of a missing woman was found in a well | बेपत्ता महिलेचा विहिरीत आढळला मृतदेह

बेपत्ता महिलेचा विहिरीत आढळला मृतदेह

सुलतानपूर : मेहकर पोलीस स्टेशन अर्तगत येत असलेल्या शिवणीपिसा येथील बेपत्ता असलेल्या विवाहितेचा मृतदेह ६ मार्चला विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. स्वाती अशोक पिसे (२८) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

शिवणीपिसा येथील विवाहिता स्वाती अशोक पिसे ही २ मार्च राेजी शेतात कामाला जातेय असे सांगून घरून निघून गेली हाेती. सायंकाळ झाल्यावरही ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे चाैकशी केली हाेती. मात्र शाेध लागला नाही. गावशिवारातील विहिरीजवळ त्यांची चप्पल व माेबाईल आढळल्याने नातेवाईकांना संशय आला हाेता. विहिरीत पाण्याचा उपसा करूनही महिलेचा शाेध लागला नव्हता. अखेर त्याच दिवसी रात्री सदर महिला बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशन देण्यात आली होती.

मात्र ६ मार्चला सकाळी बेपत्ता असलेल्या स्वाती अशोक पिसे या विवाहितेचा मृतदेह त्याच शिवारातील शेजारील विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या प्रकरणाचा पुढील तपास पो. नि. आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनात पो.उप.नि. जायभाये, पोहेकॉ. प्रभाकर सानप, पोकॉ. निवृत्ती सानप करीत आहेत. मृत विवाहितेला ७ वर्षाचा अर्पित नावाचा मुलगा व ३ वर्षीची जान्हवी नावाची मुलगी आहे. या घटनेमुळे दाेन्ही मुलांचे मातृछत्र हरवले आहे.

Web Title: The body of a missing woman was found in a well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.