झाडावर आढळला युवकाचा जळालेला मृतदेह
By Admin | Updated: December 12, 2014 00:47 IST2014-12-12T00:47:42+5:302014-12-12T00:47:42+5:30
चिखली मार्गावर आढळला मृतदेह; अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल.

झाडावर आढळला युवकाचा जळालेला मृतदेह
अंढेरा (चिखली, जि. बुलडाणा): अर्धवट जळलेल्या अवस्थेत अज्ञात युवकाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना ११ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अंढेरापासून १ कि.मी अंतरावर चिखली मार्गावर उघडकीस आली. अंढेरा-चिखली मार्गावर डाव्या बाजूच्या वनक्षेत्रात काही अंतरावर एक निंबाच्या झाडाला अर्धवट जळलेल्या अवस्थेत एका पंचवीस वर्षीय अज्ञात युवकाचा मृतदेह लटकलेला आढळून आला. माहिती मिळताच अंढेरा पोलीस ठाणेदार नाईकवाडे व पथकांनी घटनास्थळी धाव घेतली, तर मृतदेहाच्या अंगाभोवती तार आणि कागदी पुठ्ठे गुंडाळलेले होते, शिवाय घटनास्थळावर एक बॅग, ताराचे गुंडाळे पंचनामा करताना आढळून आले. सदर मृतदेह देऊळगाव मही रुग्णालयात पाठविण्यात आला असून, अंढेरा पोलिसांनी अज्ञात आरो पींवर भादंविच्या ३0२ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.