रानडुक्कर आडवे आले, दुचाकीस्वाराचा मृत्यू
By अनिल गवई | Updated: March 20, 2024 18:11 IST2024-03-20T18:10:38+5:302024-03-20T18:11:16+5:30
पिंपळगाव नाथ गावाजवळ अचानक रानडुक्कर दुचाकीच्या आडवे आले.

रानडुक्कर आडवे आले, दुचाकीस्वाराचा मृत्यू
खामगाव: रानडुक्कर आडवे आल्याने झालेल्या दुचाकी अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री १९ मार्च रोजी घडली.
प्राप्त माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील कवडगाव येथील ममराज झामसिंग राठोड मंगळवारी सायंकाळी दुचाकी क्र एमएच - २८- बीपी-0८४३ ने गिरोली येथुन कवडगाव येथे जात होते. दरम्यान पिंपळगाव नाथ गावाजवळ अचानक रानडुक्कर दुचाकीच्या आडवे आले.
या रानडुकराला वाचविण्याच्या प्रयत्नात राठोड दुचाकीवरून खाली पडून त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी शामराव झामसिंग राठोड यांनी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनला बुधवारी तक्रार दिली. या तक्रारीवरून पिंपळगाव राजा पोलीसांनी मृतकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल केला. या घटनेचा पुढील तपास पिंपळगाव राजा पोलीस करीत आहेत.