बुलडाणा जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू
By Admin | Updated: July 16, 2017 02:24 IST2017-07-16T02:24:03+5:302017-07-16T02:24:03+5:30
मागिल तिन दिवसपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.

बुलडाणा जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू
बुलडाणा : जवळपास पंधरा दिवसाच्या दडी नंतर मागिल तिन दिवसपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. बुधवारी रात्री रिमझिम पावसाला सुरूवात झाली होती. तर १५ जुलै रोजी सतत तिसर्या दिवशी जिल्ह्यात काही तालुक्यात रिमझिम स्वरूपात पावसाने हजेरी लावल्याने जवळपास ५ हजार हेक्टरवरील पिकांना जीवदान मिळाले असून बळीराजाला दिलासा मिळाला आहे. मात्र नदी, नाल्यासह विविध प्रकल्पात अत्यल्प जलसाठा असल्यामुळे दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.