काठीने वार करून खून

By Admin | Updated: July 2, 2014 22:49 IST2014-07-02T22:47:32+5:302014-07-02T22:49:39+5:30

कोथळी येथील पन्नास वर्षीय इसमाचा डोक्य़ात काठीने वार करून खून.

Bloody with a stick | काठीने वार करून खून

काठीने वार करून खून

कोथळी : येथील एका पन्नास वर्षीय इसमाचा गावातीलच एका युवकाने डोक्य़ात काठीने वार करून खून केल्याची घटना १ जुलै रोजी रात्री घडली. याबाबत कैलास मधुकर सायसुंदर वय २६ रा. कोथळी याने बोराखेडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, त्याचे वडिल मधुकर बळीराम सायसुंदर वय ५0 हे १ जुलै रोजी रात्री दरम्यान शौचास बसले असता, इम्रानखान जब्बार खान वय २६ रा.कोथळी याने त्यांच्या डोक्यात हातात असलेल्या काठीने वार केले. दरम्यान सुनिल गरूडे, पो.पा.संघटनेचे जिल्हाअध्यक्ष विठठल पाटील, रविंद्र भोपळे, महादेव आमले यांनी रक्ताच्या थारोळयात पडलेल्या सायसुंदर यांना प्रथम बोराखेडी आरोग्य केंद्रात व त्यानंतर बुलडाणा येथील शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती होताच ठाणेदार नंदकिशोर शर्मा कर्मचार्‍यांसह घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला. मृतकाचा मुलगा कैलास सायसुंदर याच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी इम्रानखान यास अटक करून त्याच्याविरूद्ध कलम ३0२ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी आरोपी इम्रानखान याने पलढग येथील प्रभु न्हावकर, शेख अब्दुल्ला व शहानाजबी यांना जबर मारहाण केली होती. या प्रकरणी त्याला १ जुलै रोजी याला मिळाली होती.

Web Title: Bloody with a stick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.