प्रगटदिन सोहळ्यानिमित्त रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:05 IST2021-03-04T05:05:03+5:302021-03-04T05:05:03+5:30

श्री संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त सकाळी ७ वाजता श्रींचा लघुरुद्र अभिषेक, त्यानंतर रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात येणार आहे. ...

Blood donation camp for Revelation Day celebrations | प्रगटदिन सोहळ्यानिमित्त रक्तदान शिबिर

प्रगटदिन सोहळ्यानिमित्त रक्तदान शिबिर

श्री संत गजानन महाराज प्रगटदिनानिमित्त सकाळी ७ वाजता श्रींचा लघुरुद्र अभिषेक, त्यानंतर रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता श्रींची महाआरती होणार आहे. सायंकाळी ७ वाजता वाशिमचे आ. किरण सरनाईक यांच्याहस्ते श्रींची आरती होणार आहे. या प्रगटदिन सोहळ्यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन संस्थानचे अध्यक्ष श्याम उमाळकर, उपाध्यक्ष सुदेश लोढे, सुरेश मुंदडा, सचिव भूषणभैय्या देशमुख, घनश्याम जोशी, भूषण मिनासे, ज्येष्ठ विश्वस्त बाळासाहेब सावजी, विष्णुपंत पाखरे, विलास चनखोरे, वैभव उमाळकर यांच्यासह समस्त विश्वस्त मंडळ यांनी केले आहे. सर्व भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष श्याम उमाळकर व विश्वस्त मंडळाने केले आहे.

Web Title: Blood donation camp for Revelation Day celebrations