देऊळगाव साकर्शा येथे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:35 IST2021-09-11T04:35:29+5:302021-09-11T04:35:29+5:30

कोरोनामुळे निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता देऊळगाव साकर्शा येथील सरपंच संदीप अल्हाट यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबिर घेण्यात आले. ...

Blood donation camp at Deulgaon Sakarsha | देऊळगाव साकर्शा येथे रक्तदान शिबिर

देऊळगाव साकर्शा येथे रक्तदान शिबिर

कोरोनामुळे निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता देऊळगाव साकर्शा येथील सरपंच संदीप अल्हाट यांच्या पुढाकारातून रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी सामाजिक उपक्रम म्हणून परिसरात वृक्षारोपण ही करण्यात आले. या कार्यक्रमाला आ. डॉ. संजय रायमुलकर, युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव, डॉ. राधाकिसन राठी, राजू पळसकर जि. प. कृषी सभापती, दिलीप देशमुख, तेजराव जाधव, सुरेश वाळुकर, निरज रायमुलकर, भूषण घोडे, रितेश जैन, सुपाजी पायघन, मोतीचंद राठोड आदी उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमाला टायगर ग्रुप राष्ट्रीय उपाध्यक्ष भैयासाहेब बंडगर यांनी भेट दिली. यावेळी वाशिम नगरपालिकेचे नगरसेवक बाळू मुरकुटे, विदर्भ टायगर ग्रुप प्रांत प्रमुख किशोर काळदाते, मंगेश गाडगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ओम सोनुने यांनी केले. आभार गजानन अल्हाट यांनी मानले.

Web Title: Blood donation camp at Deulgaon Sakarsha