रक्तदान शिबिरात ५५ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:31 IST2021-04-26T04:31:24+5:302021-04-26T04:31:24+5:30
कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. रुग्णालयात रक्ताचा साठा अत्यल्प आहे, अशातच नेहमीच सामाजिक ...

रक्तदान शिबिरात ५५ जणांचे रक्तदान
कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. रुग्णालयात रक्ताचा साठा अत्यल्प आहे, अशातच नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे शिवछत्र मित्र मंडळ या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी पुढाकार घेत शहरातील मित्र मंडळाला आवाहन करीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले. याला प्रतिसाद देत ईमरान खान मित्र मंडळ, रामनगर मित्र मंडळ, शिवराय प्रतिष्ठान, टायगर ग्रुफ, महात्मा फुले मित्र मंडळ, स्वामी मित्र मंडळ, शिंदे-गवई मित्र मंडळ यांनी सहभागी होत रक्तदान केले. या शिबिरात ५५ जणांनी रक्तदान केले. यावेळी शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी, ठाणेदार रवींद्र देशमुख, नायब तहसीलदार हेमंत पाटील, शिवसेना शहरप्रमुख पांडुरंग सरकटे, बुलडाणा अर्बन ब्लड सेंटरचे महेश भक्कड, संदीप तोरमल, अनिल जाधव, अनिल म्हस्के, सतीष झिने, सागर सिरसाठ, विलास मापारी, संदीप शिंदे, गौतम गवई, योगेश वारे, देवा ठाकूर, डाॅ. दयानंद ओव्हर, विलास सानप, शंकर तनपुरे यांची उपस्थिती होती.