खामगाव येथील रक्तदान शिबिरात ४४० जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 07:10 PM2021-05-05T19:10:57+5:302021-05-05T19:11:11+5:30

Blood donation : संत तुकाराम महाराज सभागृह येथे महारक्तदान शिबीर पार पडले.

Blood donation of 440 people in blood donation camp at Khamgaon | खामगाव येथील रक्तदान शिबिरात ४४० जणांचे रक्तदान

खामगाव येथील रक्तदान शिबिरात ४४० जणांचे रक्तदान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव:   संत तुकाराम महाराज सभागृह येथे महारक्तदान शिबीर पार पडले. या शिबिरात ४४० जणांनी रक्तदान केले. तद्नंतर खामगांव येथील सामान्य रुग्णालय येथे व  लॉयन्स क्लब खामगांवद्वारा संचालीत लॉयन्स अन्नछत्र येथे  माजी नगराध्यक्षा राणा अशोकसिंह सानंदा, माजी नगराध्यक्षा सौ.अलकादेवी सानंदा व राणा दिग्वीजयसिंह सानंदा यांच्या हस्ते गरजूंना अन्नदान करण्यात आले. याप्रसंगी लॉयन्स क्लब खामगांव अध्यक्ष तेजस झांबड, संतोष देशमुख,किशोर गरड, अभिषेक अग्रवाल, राजेश आटोळे, आदित्य राजपूत यांच्यासह लॉयन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. वाढदिवासाच्या निमित्ताने सजनपुरी येथील शिवाजी सुधाकर गिते या दिव्यांग तरुणाला दिलीपकुमार सानंदा यांच्या हस्ते तीन चाकी सायकलचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.सदानंद धनोकार, शेगांव तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले, माजी जि.प.अध्यक्षा सौ.वर्षाताई वनारे,माजी नगराध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने, नगरसेवक किशोरआप्पा भोसले, पं.स.सदस्य मनिष देशमुख, युवक कॉंग्रेसचे जिल्हा महासचिव तुषार चंदेल, सोशल मिडीयाचे आकाश जैस्वाल, माजी जि.प.सदस्य सुरेशसिंह तोमर, माजी जि.प.सदस्य श्रीकृष्ण धोटे, वाडीचे सरपंच विनोद मिरगे,वैभव गायकवाड, प्रितम माळवंदे, ज्ञानेश्वर शेजोळे, पं.स.सदस्य मनिष देशमुख, रोहित राजपुत उपस्थित होते.
 

Web Title: Blood donation of 440 people in blood donation camp at Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.