जानेफळ येथे १८६ जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:28 IST2021-01-14T04:28:30+5:302021-01-14T04:28:30+5:30
जानेफळ : ‘रक्तदान श्रेष्ठ दान’ अशा कार्यात पुढाकार घेत येथील नवयुवकांसह युवती तसेच महिलांनीसुद्धा १२ जानेवारी रोजी झालेल्या ...

जानेफळ येथे १८६ जणांचे रक्तदान
जानेफळ : ‘रक्तदान श्रेष्ठ दान’ अशा कार्यात पुढाकार घेत येथील नवयुवकांसह युवती तसेच महिलांनीसुद्धा १२ जानेवारी रोजी झालेल्या रक्तदान शिबिरात सहभाग घेत तब्बल १८६ जणांनी रक्तदान केले. या वेळी या सर्वांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
जिजाऊ दशरात्रोत्सव व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त जानेफळ येथे गेल्या ४ वर्षांपासून स्थानिक जय संतोषी माता क्रीडा मंडळ, आझाद मित्र मंडळ, महर्षी वाल्मिकी मंडळ, क्रांतिसूर्य महात्मा फुले ग्रुप, जय बजरंग क्रीडा मंडळ, राजमाता जिजाऊ मंडळ, महाबली आखाडा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मित्र मंडळ, टायगर ग्रुप, जीवन अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्था, महात्मा बसवेश्वर बहू युवा प्रतिष्ठान, भीमबल क्रीडा मंडळ, जय गजानन मित्र मंडळ, संताजी महाराज नवयुवक मित्रमंडळ, श्री संत सेना नाभिक मंडळ, रेणुका माता गोंधळी समाज बहु. संस्था, क्षत्रिय भावसार समाज अशी गावातील विविध मंडळे व संस्था मिळून दरवर्षी १२ जानेवारी रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करीत असतात. रक्तदान करणाऱ्यांची संख्या वर्षानुवर्षे वाढत असून, या वर्षी विक्रमी १८६ जणांनी रक्तदान केले. या वेळी रक्तदान करणाऱ्यांना चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच प्रत्येकाला प्रमाणपत्रही देण्यात आले. बुलडाणा येथील लीलावती ब्लड बँक बुलडाणा, कांता देवी ब्लड बँक वाशिम, अकोला ब्लड बँक अकोला यांनी रक्तसंकलन केले.