सिंदखेडराजा मतदारसंघावर भाजपचा दावा
By Admin | Updated: August 1, 2014 02:21 IST2014-08-01T02:01:21+5:302014-08-01T02:21:14+5:30
पत्रकार परिषदेत माहिती : इच्छुकांच्या रविवारी मुलाखती

सिंदखेडराजा मतदारसंघावर भाजपचा दावा
खामगाव : जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात भाजपातर्फे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती ३ ऑगस्ट रोजी बुलडाणा सिंदखेड राजा विधान सभा मतदार संघावर भाजपाने दावा केला आहे. या मतदार संघात शिवसेनेचा नेहमी होणारा पराभव पाहता भाजपाकडून दावा करण्यात येत असल्याची माहिती आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपा जिल्हाध्यक्ष आ.डॉ.संजय कुटे यांनी दिली. येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला माजी विधान परिषद विरोधी पक्षनेता आ.भाऊसाहेब फुंडकर, जिल्हा सचिव शेखर पुरोहित, तालुकाध्यक्ष शरद गायकी, शहराध्यक्ष संजय सिनगारेआदींची उपस्थिती होती. आगामी विधान विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाच्या बैठकांना प्रारंभ झाला आहे. भाजपाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविण्याची मोठय़ा प्रमाणावर इच्छूक आहेत. मात्र याबाबतचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर ठरविला जाणार आहे. यासाठी ३ ऑगस्ट रोजी बुलडाणा येथे भाजपाच्यावतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला जिल्हा निरीक्षक तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष गिरीश महाजन व डॉ. भागवत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या बैठकीतच भाजपाकडून निवडणूक लढवू इच्छिणार्यांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. तसेच चिखली विधानसभा मतदार संघावर स्वाभीमानी पक्षाकडून दावा केल्या जात आहे. या संदर्भात आ.डॉ.कुटे यांनी गत निवडणुकीचा अपवाद वगळता भाजपाचा उमेदवार सलग तीनवेळा विजयी झाला आहे. त्यामुळे या मतदार संघात भाजपाचाच उमेदवार असेल मत कुटे यांनी व्यक्त केले. तसेच सिंदखेड राजा मतदार संघात शिवसेनेचा होत असलेला पराभव पाहता हा मतदार संघ यावेळी भाजपाला सोडावा, असा दावा सुध्दा आ. कुटे यांनी केला. तर ३0 जुलै रोजी संजय ठाकरे, सारंगसिंग चव्हाण, प्रल्हाद बगाडे यांनी भाजपाची उमेदवारी मिळण्याबाबत पत्रकार परिषदेत केलेली मागणी चुकीचा मार्ग असून पक्षाकडे करावी असे सुध्दा या पत्रकार परिषदेदरम्यान आ.डॉ.कुटे यांनी सांगितले.