ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यासाठी भाजपचे आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:22 IST2021-06-27T04:22:27+5:302021-06-27T04:22:27+5:30

डोणगाव महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षण रद्द केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीसी राजकीय ...

BJP's agitation to maintain OBC reservation | ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यासाठी भाजपचे आंदाेलन

ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यासाठी भाजपचे आंदाेलन

डोणगाव

महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षण रद्द केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीसी राजकीय आरक्षण लागू करण्यात यावे म्हणून स्थानिक बसस्थानक परिसरात राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी डोणगावच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले. यावेळी अर्जुनराव वानखेडे बुलडाणा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, रमेश पाटील पाचपोर युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, राजेश पाखरे तालुका अध्यक्ष कि आ, राजेश इंगोले जिल्हा उपाध्यक्ष किसान आघाडी, सुनील पाटील शेवाळे राज्य परिषद सदस्य, सागर बाजड तालुका अध्यक्ष युवा किसान आघाडी, ज्योती बुरखंडे शहर अध्यक्ष, राजेश वानखेडे जिल्हा सचिव, नागेश राजबिंडे किसान आघाडी जिल्हा सरचिटणीस, गजानन नागोलकर, विलास परमाळे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते विनोद पिंपरकर, नागेश राजबिंडे, गजानन वानखेडे ग्रामपंचायत सदस्य, रवी कष्टे शेलगाव,शरद वानखेडे बेलगाव, अमोल बाजड,विठ्ठल वानखेडे बेलगाव व भुजबळ मामा, जयपाल शर्मा, अनेक कार्यकर्ते उपस्थितीत होते़ यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता़

Web Title: BJP's agitation to maintain OBC reservation