मेहकरात शिवसेनेच्या वतीने भाजपा पदाधिकाऱ्यांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:36 IST2021-04-20T04:36:20+5:302021-04-20T04:36:20+5:30

खा. प्रतापराव जाधव व आ. संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. कोरोना वाढत आहे, परंतु भाजपा यामध्ये ...

BJP office bearers protest on behalf of Shiv Sena in Mehkar | मेहकरात शिवसेनेच्या वतीने भाजपा पदाधिकाऱ्यांचा निषेध

मेहकरात शिवसेनेच्या वतीने भाजपा पदाधिकाऱ्यांचा निषेध

खा. प्रतापराव जाधव व आ. संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. कोरोना वाढत आहे, परंतु भाजपा यामध्ये राजकारण करून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप करून शिवसेनेच्यावतीने भाजपचा निषेध करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी रस्त्यावर टरबूज फोडले व तहसीलदार डॉ. संजय गरकल यांना निवेदन दिले. याप्रसंगी उपनगराध्यक्ष तथा शहरप्रमुख जयचंद बाठिया, नगरसेवक ओम सौभागे, विकास जोशी, मनोज घोडे, युवा सेना तालुका प्रमुख भूषण घोडे, शहर प्रमुख संजय खंडागळे, नगरसेविका आक्का गायकवाड, सैय्यद अखतरभाई चुडीवाले, विवेक देशमुख, शुभम राऊत, अमोल शेजुळ, मोहन ठाकरे, प्रदीप नागरिक, हर्षल गायकवाड, मंगेश गायकवाड, पीयूष केळे, विलास आखाडे यांच्यासह शिवसैनिक हजर होते.

भाजपाने द्वेषाचे राजकारण करू नये- संजय रायमुलकर

जिल्ह्यात १८ एप्रिलला भाजपाने शिवसेना आ. संजय गायकवाड यांच्या पुतळ्याचे दहन केले. या घटनेचा शिवसेना निषेध करीत आहे, असे मत आ. संजय रायमुलकर यांनी व्यक्त केले. सध्या कोरोनाने सर्वत्र गंभीर परिस्थिती आहे. रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड मिळत नाही. त्यामुळे जीव गमवावे लागत आहेत. ज्यांच्या घरात या घटना घडतात, त्यांचे दु:ख बघितल्यावर परिस्थिती समजते. ही वेळ एकमेकांना दोष देण्याची नाही तर राज्यातील सरकारला राजकारण बाजूला ठेवून मदत करण्याची आहे. मात्र भाजपा असे वागत नाही ही खंत रायमुलकर यांनी यावेळी व्यक्त केली.

Web Title: BJP office bearers protest on behalf of Shiv Sena in Mehkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.