नीट परीक्षेत उर्दू भाषेचा समावेश करण्याची भाजप अल्पसंख्याक मोर्चाची मागणी
By Admin | Updated: January 3, 2017 17:42 IST2017-01-03T17:42:10+5:302017-01-03T17:42:10+5:30
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट ही परीक्षा २०१७ पासून इंग्रजीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्येही देता येणार आहे.

नीट परीक्षेत उर्दू भाषेचा समावेश करण्याची भाजप अल्पसंख्याक मोर्चाची मागणी
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 3 - वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट ही परीक्षा २०१७ पासून इंग्रजीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्येही देता येणार आहे. परंतु, नीट परीक्षेत उर्दु भाषेचा समावेश नसल्याने राज्यभरातील उर्दू कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना नीट परीक्षा देणे अडचणीचे होणार आहे. त्यामुळे नीट परीक्षेत इतर भाषांबरोबर उर्दू भाषेचाही समावेश
करण्याची मागणी भाजपाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्यावतीने मुख्यमंत्र्यासह शिक्षणमंत्र्याकडे करण्यात आली आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नॅशनल इलिजिबिलिटी ककम एंट्रन्स टेस्ट म्हणजे नीट ही परीक्षा २०१७ पासून इंग्रजीसह अन्य प्रदेशिक भाषांमध्ये देता येणार आहे. यामध्ये केंद्राकडून इंग्रजीसह मराठी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, तामिळ आणि तेलगू या प्रादेशिक भाषांमध्येही परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. मात्र, यामध्ये उर्दू भाषेचा समावेश नाही. महाराष्ट्र राज्यात संपूर्ण ठिकाणी शेकडोच्यावर उर्दू कॉलेजमध्ये हजारोंच्या संख्येने मुस्लिम विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू असून तेही उर्दू विषयांच्या अभ्यासक्रमानुसार सुरू आहे. ऐन नीटच्या परीक्षा वेळीच उर्दू भाषेत परीक्षा झाली नाही तर उर्दू माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होऊ शकते. इंग्रजीसह मराठी भाषेत होणाऱ्या नीट परीक्षामध्ये उर्दू विषयातून अभ्यासक्रम करणारे हजारोंच्या संख्येने मुस्लिम विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. मुस्लिम विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी नीट परीक्षेमध्ये उर्दू विषयाचा समावेश करण्यात यावा व उर्दू भाषांमध्येही नीट परीक्षा देण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पाट्री अल्पसंख्याक मोर्चा बुलडणाचे जिल्हा सरचिटणीस वसीम शेख अनवर,
मो.अन्सार शे.अन्वर, मो.अशपाक शे.युनूस, मो.दानिश मो.रफिक, मो.शहनवाज मो.युनूस, आसीफ खान रशीद खान यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यासह शिक्षणमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.