शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरात भाजप शहराध्यक्षास राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षाकडून मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 17:52 IST

मलकापूर : येथील वीर जगदेवराव सहकारी सुतगिरणीचे माजी कार्याध्यक्ष तथा विद्यमान मलकापूर शहर भाजपा अध्यक्ष रामभाऊ झांबरे व त्यांच्या चालकास राष्ट्रवादीचे मोताळा तालुकाध्यक्ष सुनिल घाटे यांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना येथील संताजी नगरात बुधवारी रात्री १० वाजेच्या दरम्यान घडली.

ठळक मुद्देभाजप शहराध्यक्ष रामभाऊ झांबरे बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास संताजी नगरातील त्यांच्या मालकीच्या साईराम अपार्टमेंटमध्ये जात होते. मोताळा राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सुनिल घाटे रा.मोताळा, त्यांचा मुलगा व ब्रोकर अनिल अग्रवाल तिथ पोहचले. व त्यांच्यात क्षुल्लक कारणांवरुन वाद झाला. पाहता पाहता त्याच पर्यावसन हाणामारीत झाले. सुरुवातीस झांबरे ह्यांना लोखंडी पाईपाचे वार करण्यात आले.

मलकापूर : येथील वीर जगदेवराव सहकारी सुतगिरणीचे माजी कार्याध्यक्ष तथा विद्यमान मलकापूर शहर भाजपा अध्यक्ष रामभाऊ झांबरे व त्यांच्या चालकास राष्ट्रवादीचे मोताळा तालुकाध्यक्ष सुनिल घाटे यांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना येथील संताजी नगरात बुधवारी रात्री १० वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी सुनिल घाटे यांच्यासह तिघांवर मलकापूर पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल झाले आहेत. मलकापूरचे भाजप शहराध्यक्ष तथा सुतगिरणीचे माजी कार्याध्यक्ष रामभाऊ झांबरे बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास संताजी नगरातील त्यांच्या मालकीच्या साईराम अपार्टमेंटमध्ये जात होते. ते कार पार्क करुन घरात जाण्यासाठी निघाले असता मोताळा राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सुनिल घाटे रा.मोताळा, त्यांचा मुलगा व ब्रोकर अनिल अग्रवाल तिथ पोहचले. व त्यांच्यात क्षुल्लक कारणांवरुन वाद झाला. पाहता पाहता त्याच पर्यावसन हाणामारीत झाले. सुरुवातीस झांबरे ह्यांना लोखंडी पाईपाचे वार करण्यात आले. त्यानंतर दोघांपैकी एकाने झांबरे ह्यांना पकडले व उर्वरितांनी जबर मारहाण केली. लाथाबुक्क्याही मारण्यात आल्या, अशी माहिती घटनास्थळी उपस्थितांनी दिली.  डोक्यात पाईपचा वार झाल्याने व उजव्या हातावर व पायावर मारहाण झाल्याने गंभीर जखमी अवस्थेत रामभाऊ झांबरे व त्यांचा चालक अजय सुरपाटणे ह्या दोघांना  स्थानीय मानस हॉस्पीटलात दाखल करण्यात आले. डॉ.मनोज पाटील यांनी त्यांच्यावर बुधवारी रात्री उशिरापर्यंत उपचार केले. सद्याही दोघे भरती आहेत. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी अजय जगतराव सुरपाटणे (वय ३८) यांच्या फिर्यादीवरुन सुनिल घाटे, त्यांचा मुलगा व ब्रोकर अनिल अग्रवाल या तीन जणांविरुध्द अपराध नं.२७/१८ कलम ३२३,३२४,५०४,५०६,३४ अन्वये भादवीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी झायलो कारची देखील काचा फोडण्यात आल्या असून सुमारे ३५ हजाराचे नुकसान करण्यात आले आहे. तपास पोहेकॉ गजानन पाटील करीत आहेत.

टॅग्स :malkapur bypassमलकापूर बायपासBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस