बुलडाण्यात भाजप-काँग्रेस पदाधिका-यांमध्ये राडा!

By Admin | Updated: July 12, 2017 20:03 IST2017-07-12T19:31:30+5:302017-07-12T20:03:46+5:30

बुलडाणा : सरकारने कर्जमाफी दिली असून, आता आंदोलन करू नका अशी मागणी करण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालून घोषणाबाजी व धक्काबुक्की केली.

BJP-Congress workers in Bulada rada! | बुलडाण्यात भाजप-काँग्रेस पदाधिका-यांमध्ये राडा!

बुलडाण्यात भाजप-काँग्रेस पदाधिका-यांमध्ये राडा!

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सरकारने कर्जमाफी दिली असून, आता आंदोलन करू नका, तसेच मुंबईप्रमाणेच आदर्श घोटाळा बुलडाण्यात करू नका, अशी मागणी करण्याकरिता जिल्हा परिषद सभापती श्वेता महाले व भाजपचे अन्य पदाधिकारी कॉंग्रेस कार्यालयाजवळ गेले असता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालून घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याने काही काळ याठिकाणी तणाव निर्माण झाला होता.
बुधवारी दुपारी १२. ३० ते १ वाजेपर्यंत कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली. सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी विरोधात कॉग्रेस पुन्हा राज्यभर एल्गार पुकारणार आहे. या आंदोलनाची सुरूवात बुलडाण्यातून होणार असून, त्याकरिता प्रदेषाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, विधान परिषदेतील उपसभापती माणिकराव ठाकरे बुलडाण्यात आले. कार्यक्रम सुरू होण्याला काही अवधी असतानाच भाजपच्या नेत्या तथा जिल्हा परिषद सभापती श्वेता महाले, भाजपचे तालुकाध्यक्ष मोहन पवार, शहराध्यक्ष महिला आघाडी विजया राठी काँग्रेस कार्यालयाबाहेर गेल्या. यावेळी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला. तसेच "नरेंद्र मोदी हायहाय", "भाजप सरकार मुर्दाबाद" अशी घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी येवून तणाव निवळला. पोलिसांनी बंदोबस्त ठेवला मात्र कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावेळी मंगळसुत्र तोडल्याचा आरोप श्वेता महाले यांनी केला आहे.

 

Web Title: BJP-Congress workers in Bulada rada!