पैसे मागितले म्हणून चावा घेतला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2017 00:18 IST2017-06-30T00:18:59+5:302017-06-30T00:18:59+5:30
खामगाव: हॉटेल मालकाने पैसे दे, नंतर भजे देतो, असे म्हटले असता, वाद होऊन एकास चावा घेऊन जखमी केल्याची घटना २८ जून रोजी गारडगाव येथे घडली.

पैसे मागितले म्हणून चावा घेतला!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: हॉटेलवर गेलेल्या इसमाने भजे मागितले. त्यावर हॉटेल मालकाने म्हटले की पहिले पैसे दे, नंतर भजे देतो, असे म्हटले असता दोघात वाद होऊन एकास चावा घेऊन जखमी केल्याची घटना २८ जून रोजी गारडगाव येथे घडली. अमोल सागर इंगळे (वय ३२) रा. गारडगाव हा योगेश हेलोडे याच्या हॉटेलवर भजे खाण्याकरिता गेला होता. अमोल इंगळे याने भजे मागितले असता हॉटेल चालक योगेश हेलोडे याने म्हटले की, पहिले पैसे दे नंतर तुला भजे देतो. यावरून वाद केला. योगेश हेलोडे याने अमोल इंगळे याच्या हातावर चावा घेऊन जखमी केले. ग्रामीण पोलिसांनी आरोपी योगेश हेलोडे याच्यावर कलम ३२४ भादंविचा गुन्हा दाखल केला.