पक्ष्यांची नुकसान भरपाई द्यावी: शेळके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:34 IST2021-02-05T08:34:12+5:302021-02-05T08:34:12+5:30
शहरातील जिमखाना येथे २८ जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी ग्रीन ॲग्रोचे सदस्य डॉ.विजय भाले यांची ...

पक्ष्यांची नुकसान भरपाई द्यावी: शेळके
शहरातील जिमखाना येथे २८ जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी ग्रीन ॲग्रोचे सदस्य डॉ.विजय भाले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. दोन दिवसांपूर्वी चिखली तालुक्यातील भानखेड येथे बर्ड फ्लू या आजाराचा शिरकाव झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शेकडो कोंबड्यांना ठार केले आहे, शिवाय एक किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित केले आहे. त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी व बेरोजगार युवक कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळले आहेत. या व्यवसायातून अनेक बेरोजगारांनी उन्नती साधली आहे, शिवाय या व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू आहे. एकट्या बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथे ८० हजार पक्षी असून, ६५ हजार अंड्याची क्षमता आहे. कंपनीच्या वतीने अनेक शेतकऱ्यांशी करार करण्यात आला असून, शेतकऱ्यांकडे दीड लाख पक्षी असून, सव्वा लाख अंड्याची उत्पादन क्षमता आहे, परंतु मागील दोन ते तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात बर्ड फ्लू या आजाराचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे ज्या पक्ष्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशा पक्ष्यांची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे, परंतु ज्या पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू या आजाराचा कुठलाच प्रादुर्भाव झाला नाही, अशा पक्ष्यांना ठार मारण्यात येत आहे. त्यामुळे कुक्कुटपालन व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी तपासणी न करताच कोंबड्याना ठार मारणे थांबविण्यात यावे, अशी मागणी शेळके यांनी यावेळी केली आहे.