बाजार समितीवर ‘बळीराजा पॅनल’चे वर्चस्व

By Admin | Updated: June 9, 2015 00:13 IST2015-06-09T00:13:29+5:302015-06-09T00:13:29+5:30

बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत बळीराजा समृद्धी पॅनलने सर्वाधिक दहा जागांवर विजयी.

'Biliraja panel' dominates market committee | बाजार समितीवर ‘बळीराजा पॅनल’चे वर्चस्व

बाजार समितीवर ‘बळीराजा पॅनल’चे वर्चस्व

 बुलडाणा : बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागेसाठी ७ जून रोजी मतदान घेण्यात आले. सोमवारी मतमोजणी झाल्यानंतर बुलडाणा बाजार समितीवर बळीराजाचे वर्चस्व स्पष्ट झाले. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत बळीराजा समृद्धी पॅनलने सर्वाधिक दहा जागांवर विजय संपादन केला तर शिवसेना पुरस्कृत जय किसान पॅनलला आठ जागांवर समाधान मानावे लागले. तर स्वतंत्रपणे रिंगणात असलेल्या भाजपला एकाही जागेवर विजय संपादन करता आला नाही. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा जागांसाठी काल ७ जून रोजी बुलडाणा, देऊळघाट, रायपूर व धाड या चार मतदान केंद्रावरून मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत मतदारांनी उत्साह दाखविल्यामुळे ९५.४५ टक्के मतदान झाले. १ हजार ७0९ मतदारांपैकी तब्बल १ हजार ६३६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता.

Web Title: 'Biliraja panel' dominates market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.