घरासमोर उभी असलेली दुचाकी जाळली!
By Admin | Updated: February 17, 2017 01:18 IST2017-02-17T01:18:28+5:302017-02-17T01:18:28+5:30
३0 हजार रुपयांचे नुकसान

घरासमोर उभी असलेली दुचाकी जाळली!
खामगाव, दि. १६- : घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञातांनी जाळल्याची घटना गोपाळनगर भागातील घरकुलजवळ बुधवारी रात्री घडली. चंदन त्र्यंबक हेलोडे (वय २६) रा. गोपाळनगर घरकुल या युवकाने त्याची ड्रिम युगा दुचाकी क्र. एमएच २८ डब्ल्यू १0६८ ही रात्री घरासमोर उभी केली होती. दरम्यान, अज्ञातांनी सदर दुचाकीला आग लावली. आगीत दुचाकी पूर्णत: जळाल्याने युवकाचे ३0 हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी चंदन त्र्यंबक हेलोडे याने शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून, तक्रारीत जवळच राहणारे किरण व त्याची पत्नी यांच्याविरुद्ध संशय असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. खामगाव पोलिसांनी सध्या अज्ञाताविरुद्ध ४३५ आयपीएस नुसार गुन्हा दाखल केला आहे.