शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde: खासदाराचा मोठा गौप्यस्फोट, ठाकरे गटाचे ८ आमदार ३ खासदार शिंदे गटात येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 14:19 IST

बुलडाणा जिल्ह्यातील शिंदे गटाचे नेते आणि शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एकदा गौप्यस्फोट केला आहे.

बुलडाणा - राज्यात शिवसेनेत मोठा बंड झाल्यानंतर शिंदे गटाने ५० आमदारांसह सत्ता स्थापन केली. विशेष म्हणजे कमी संख्याबळ असताना शिंदे गटाचे प्रमुख आणि सध्याच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदही मिळाले. त्यानंतर, शिवसेनेच्या १२ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. तर, काही दिवसांपूर्वीच शिवसेनाखासदार गजानन किर्तीकर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे, शिंदे गटाची ताकद आणखी वाढली असून आता खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी मोठा दावा केला आहे. त्यानुसार, ८ आमदार आणि ३ खासदार शिंदे गटात येणार असल्याचं भाकीत त्यांनी केलं आहे.  

बुलडाणा जिल्ह्यातील शिंदे गटाचे नेते आणि शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एकदा गौप्यस्फोट केला आहे. निवडणूकीच्या तोंडावर 3 खासदार आणि 8 आमदार 100 टक्के शिंदे गटात येतील असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ माजली आहे. याअगोदर देखील खासदार जाधव यांनी मुंबईचे एक खासदार शिंदे गटात येतील असा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात सामील झाले. मात्र, आता पुन्हा एकदा खा. जाधव यांनी ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात सामील होतील असा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

निवडणूकीपूर्वी ठाकरे गटाचे घर खाली असेल असा दावा खासदार जाधव यांनी केला असून 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. जाधव यांच्या या विधानामुळे आता ते ८ आमदार आणि ३ खासदार कोण? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर, ठाकरे गटातही या गौप्यस्फोटानंतर चाचपणी करण्यात येऊ शकते. दरम्यान, यापूर्वी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यादिवशीही ३ खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यावेळी, एकाही खासदाराने किंवा आमदाराने शिंदे गटात प्रवेश केला नाही. त्यामुळे, प्रतापराव जाधव यांनी केलेला दावा कितपत खरा ठरणार हेही वेळ आल्यावरच दिसणार आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMember of parliamentखासदारMLAआमदारShiv Senaशिवसेनाbuldhanaबुलडाणा