शेतीसाठी बृहद कार्यक्रम आखणार!

By Admin | Updated: May 7, 2017 02:29 IST2017-05-07T02:29:26+5:302017-05-07T02:29:26+5:30

मुख्यमंत्र्यांची घोषणा; जलयुक्त शिवारच्या विविध कामांची केली पाहणी.

A big program for agriculture will be done! | शेतीसाठी बृहद कार्यक्रम आखणार!

शेतीसाठी बृहद कार्यक्रम आखणार!

जळगाव जामोद : खारपाणपट्टय़ातील शेतकर्‍यांना शाश्‍वत शेती करता यावी, यासाठी वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून बृहद कार्यक्रम आखणार असल्याची माहिती मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव बु. येथे मुख्यमंत्र्यांनी शनिवारी शेततळ्याची पाहणी केली. तसेच येथील शेतकर्‍यांशी संवाद साधला. शेततळ्यामुळे कसा फायदा होतो, याची माहिती शेतकर्‍यांकडून जाणून घेतली व गट शेती करावी, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. तसेच गाडेगाव खुर्द येथे नाला रुंदीकरणाच्या कामाची पाहणी केली व समाधान व्यक्त करीत या रस्त्याच्या दुतर्फा, वृक्ष लागवड करावी, असे सुचित केले. खांडवी येथे भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या रिचार्ज साफ्ट कामाची पाहणी करून, मुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांना सूचना केल्या. आसलगाव येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या श्रीमती गीता सोनाजी दांडेकर यांच्या घरकुलाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच अडचणींबाबत त्यांच्याशी चर्चा केली. खांडवी येथे गणेश उत्तम तायडे यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय व घरकुल बांधकामाची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी गृह राज्यमंत्री ना.डॉ. रणजित पाटील, आ.डॉ. संजय कुटे, आ.अँड. आकाश फुंडकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी ष्णमुखराजन, ह्यलोकमतह्ण मुंबईचे विशेष प्रतिनिधी यदू जोशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लव्हाळे, भाजपा तालुका अध्यक्ष राजेंद्र गांधी, शहर अध्यक्ष डॉ. प्रकाश बगाडे, जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर अग्रवाल, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, नगराध्यक्ष सीमाताई डोबे, भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आ.धृपतराव सावळे, सेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता पाटील, तालुकाप्रमुख गजानन वाघ, जि.प. अध्यक्ष उमा तायडे, जि.प. अर्थ व बांधकाम सभापती राजेंद्र उमाळे, जि.प.सदस्य बंडू पाटील, मंजूषा तिवारी, रुपाली काळपांडे, पं.स. सभापती गीता बंडल, उपसभापती रामेश्‍वर राऊत, न.प. उपाध्यक्ष मांगीलाल भंसाली, न.प. सभापती नलू भाकरे, शिक्षण सभापती उषा धंदर, सविता खवणे, जयमाला इंगळे, अनिता कपले, रत्नप्रभा खिरोडकर, नीलेश शर्मा, शैलेंद्र बोराडे, माजी नगराध्यक्ष बोंबटकार आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांनी शेअर केली सोशल मीडियावर छायाचित्रे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी गावात सुरु असल्येल्या जलसंधारणाच्या कामाचे अवलोकन केले. कामाच्या प्रगतीवर त्यांनी प्रसन्नता व्यक्त केली. त्यानंतर तिथे घेण्यात आलेली काही छायाचित्रे मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर शेयर के ली. मुख्यमंत्र्यांनी कामाचे केलेले हे अनोखे कौतुक सोशल मिडीयावर चांगलेच चर्चेचे ठरले.

Web Title: A big program for agriculture will be done!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.