मोठय़ा भावाची निर्घृण हत्या!
By Admin | Updated: April 30, 2017 02:46 IST2017-04-30T02:46:10+5:302017-04-30T02:46:10+5:30
भावजयीला शरीरसुखाची मागणी करताना आडव्या आलेल्या मोठय़ा भावाचा लहान भावाने निर्घृन खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.

मोठय़ा भावाची निर्घृण हत्या!
सुनगाव (जि. बुलडाणा): भावजयीला शरीरसुखाची मागणी करताना आडव्या आलेल्या मोठय़ा भावाचा लहान भावाने निर्घृन खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी मृतकाच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.
सुनगाव येथील रमेश गणपत फुसे (वय २७ ) हे गावानजीक असलेल्या शेतात राहतात. दरम्यान, अक्षय्यतृतीयेच्या आदल्या रात्री तीन वाजताच्या सुमारास रमेश यांचा लहान भाऊ नीलेश फुसे (वय २१) हा त्यांच्या घरी पोहचला. त्याने भावजयीसोबत शरीरसुखाची मागणी करुन रमेशला दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिले. परंतु रमेशने दरवाजा उघडला नाही. यामुळे राग मनात धरुन असलेल्या नीलेशने शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास रमेशला याबाबत जाब विचारला आणि वखराची लोखंडी पास त्याच्या डोक्यात घालून निर्घृन खून केला.
यासंदर्भात मृतकाची पत्नी अर्चना रमेश फुसे (वय २६) यांनी जळगाव जामोद पो.स्टे.ला उपरोक्त आशयाची फिर्याद दिली आहे. या प्रकरणी जळगाव जा. पोलीसांनी आरोपीविरुद्ध भादंवि ३0२, ५0४, ५0६ कलमान्वये गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.