सार्वजनिक ठिकाणी खुशाल ओढा बिडी-सिगारेट; दंडच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:44 IST2020-12-30T04:44:11+5:302020-12-30T04:44:11+5:30
राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यास, थुंकण्यास व धूम्रपानास प्रतिबंध ...

सार्वजनिक ठिकाणी खुशाल ओढा बिडी-सिगारेट; दंडच नाही
राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, पानमसाला, गुटखा तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यास, थुंकण्यास व धूम्रपानास प्रतिबंध करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना दंडासह शिक्षा ठोठावण्यात येईल, असे आदेश असतानाही त्याची अंमलबजावणी बुलडाण्यात होत नसल्याचे दिसून आले आहे.
धूम्रपान करणारेच दंडापासून अनभिज्ञ
धूम्रपान करणाऱ्यांवर २०० रुपये दंड, याची जनजागृतीच झालेली नसल्याने धूम्रपान करणाऱ्या अनेकांना या दंडाविषयी माहिती नाही. बुलडाण्यातही बसस्थानक, जिल्हाधिकारी कार्यालय, नगरपालिका, ॲटो स्टॅण्ड याठिकाणी धूम्रपान करताना नागरिक आढळून आले. मेहकर तहसील कार्यालय परिसरातही असेच चित्र होते.
‘अन्न, औषध’ला
दंडाचे अधिकार प्राप्त
धूम्रपान करणाऱ्यांवर दंड करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्याला आहेत. शिवाय बसस्थानक परिसरात आगारप्रमुखाला, शाळा परिसरात मख्याध्यापकांना कॉलेज परिसरात प्राचार्याला हे अधिकार देण्यात आले आहेत. परंत दंडच होत नसल्याने सार्वजनिकठिकाणी बिनधास्तपणे धूम्रपान केल्या जात आहे.
बिडी-सिगारेट
ओढल्याचे धोके
धूम्रपानामुळे फुप्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक आहे. धूम्रपान हे स्वत: बरोबरच इतरांसाठीही धोकादायक ठरू शकते. सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग असून, त्यात धूम्रपान करणाऱ्यांनाचा याचा धोका अधिक असल्याची माहिती ह्रदयरोगतज्ज्ञ डाॅ. पंजाबराव शेजोळ यांनी दिली.