लाच मागणा-या बसचालकास अटक
By Admin | Updated: February 24, 2016 02:12 IST2016-02-24T02:12:43+5:302016-02-24T02:12:43+5:30
रजा मंजूर करुन आणण्यासाठी सहका-याला मागितले होते दोन हजार.

लाच मागणा-या बसचालकास अटक
खामगाव (जि. बुलडाणा) : आगार प्रमुखाकडून रजा मंजूर करून देण्यासाठी सहकारी चालकाकडे २ हजाराची लाच मागणार्या एसटी महामंडळाच्या बस चालकास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावतीच्या पथकाने २३ फेब्रुवारी रोजी अटक केली. खामगाव आगाराचे चालक एस.जे. इंगळे यांना १५ दिवसाची अर्जीत व ३0 दिवसांची रोखीकरण रजा हवी होती. सदर रजा आगार प्रमुखाकडून मंजूर करुन देण्यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावणारा याच आगारातील चालक इकबाल खान मेहबुब खान (वय ५0) रा.कोठारी फैल याने इंगळे यांना २ हजाराची लाच मागितली होती. याबाबत इंगळे यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती येथील पथकाकडे तक्रार केल्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला होता. मात्र इक्बाल खान महेबूब खान यास शंका आल्याने त्याने लाच स्विकारण्यास नकार दिला. परंतु पथकाच्या पडताळणी कार्यवाहीत लाच मागितल्याचे सिध्द झाल्याने इकबाल खानला अटक करण्यात आली.