दुचाकीत ओढणी अडकून अपघात; महिला ठार
By Admin | Updated: May 2, 2016 02:25 IST2016-05-02T02:25:59+5:302016-05-02T02:25:59+5:30
चिखली तालुक्यातील अपघात.

दुचाकीत ओढणी अडकून अपघात; महिला ठार
चिखली (जि. बुलडाणा) : विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी दुचाकीवरून पती आणि मुलीसोबत जाणार्या महिलेची ओढणी चाकात अडकून झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली तर अन्य दोघे जखमी झाले. ही घटना १ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास लोणी लव्हाळा फाट्यावर घडली. चिखली येथील गजानननगरमधील मोतीराम चिंचोले (४२), पत्नी लताबाई चिंचोले (३८) आणि मुलगी भाग्यश्री (११) हे चिंचोले कुटुंब एमएच २८ ए ३८0१ क्रमांकाच्या मोटारसायकलने नायगाव बु. येथे विवाहासाठी जात होते. दरम्यान, लोणी लव्हाळा फाटा मार्गावर भाग्यश्रीची ओढणी दुचाकीच्या मागील चाकात गेली. यामुळे भरधाव वेगात असणारी दुचाकीसह तिघेही खाली पडले. यात लताबाई चिंचोले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर भाग्यश्री व मोतीराम चिंचोले यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले.