दुचाकीचा अपघात; दोन ठार
By Admin | Updated: April 25, 2017 00:31 IST2017-04-25T00:31:32+5:302017-04-25T00:31:32+5:30
मलकापूरपांग्रा : मलकापूर पांग्रा येथील विजय मखमले शाळेजवळ मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन मोटारसायकलस्वार जागीच ठार झाले.

दुचाकीचा अपघात; दोन ठार
अज्ञात वाहनाने दिली दुचाकीला धडक; एक गंभीर
मलकापूरपांग्रा : सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथील विजय मखमले शाळेजवळ मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन मोटारसायकलस्वार जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २३ एप्रिलच्या रात्री १० वाजता घडली.
दुसरबिड येथे खदान कामावर काम करण्यासाठी एम.एच. ३७ - ७००३ या मोटारसायकलने अमोल संतोष देवकर व त्याचे वडील संतोष देवकर आणि नामदेव सानप हे रात्री १० वाजताच्या दरम्यान दुसरबिडला जात असताना मलकापूर पांग्रा येथील विजय मखमले शाळेजवळ अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जबर धडक दिली. यामध्ये नामदेव सानप (४३) रा दुसरबीड, अमोल संतोष देवकर (२७) रा. शेदुरजन हे घटनास्थळी ठार झाले. संतोष देवकर हे गंभीर जखमी झाले असून, त्याला उपचारासाठी बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे. साखरखेर्डा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करुन अज्ञात वाहनाविरुद्ध कलम ३०४ अ भादंवि २७९, ३३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार गीते करीत आहे. या रस्त्यावर नेहमीच अपघात होत असल्यामुळे अनेक प्रवाशांना जायबंदी व्हावे लागले. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.