शारा-वेणी रोडवर दुचाकीचा अपघात; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:24 IST2017-08-19T00:24:05+5:302017-08-19T00:24:35+5:30
लोणार : तालुक्यातील वेणी येथील शेख मुजीब शेख हबीब (४५) हे आपल्या दुचाकी क्र.एम.एच.२८ झेड २८५९ ने लोणार येथे कामानिमित्त येत असताना वेणी-शारा रस्त्यावर सकाळी ११.४५ वाजता दरम्यान त्यांची दुचाकी रस्त्याच्या खाली गेली. त्यामध्ये ते खाली कोसळले व त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालय मेहकर येथे नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

शारा-वेणी रोडवर दुचाकीचा अपघात; एक ठार
ठळक मुद्देदुचाकी रस्त्याच्या खाली गेलीखाली कोसळल्याने डोक्याला मार उपचारादरम्यान मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : तालुक्यातील वेणी येथील शेख मुजीब शेख हबीब (४५) हे आपल्या दुचाकी क्र.एम.एच.२८ झेड २८५९ ने लोणार येथे कामानिमित्त येत असताना वेणी-शारा रस्त्यावर सकाळी ११.४५ वाजता दरम्यान त्यांची दुचाकी रस्त्याच्या खाली गेली. त्यामध्ये ते खाली कोसळले व त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालय मेहकर येथे नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहे. या घटनेने वेणी गावात शोककळा पसरली आहे. यानंतर सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, यावरून मेहकर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.