माेताळा तालुक्यात विकासकामांचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:36 IST2021-02-05T08:36:28+5:302021-02-05T08:36:28+5:30
आमदार संजय गायकवाड यांनी मतदारसंघामध्ये विकासकामाचे नवीन पर्व सुरू केले आहे. त्याअंतर्गत मोताळा तालुक्यातील राजूर, इब्राहिमपूर (बजरंगपुरा), पुन्हई, ...

माेताळा तालुक्यात विकासकामांचे भूमिपूजन
आमदार संजय गायकवाड यांनी मतदारसंघामध्ये विकासकामाचे नवीन पर्व सुरू केले आहे. त्याअंतर्गत मोताळा तालुक्यातील राजूर, इब्राहिमपूर (बजरंगपुरा), पुन्हई, काळेगाव, कोऱ्हाळा बाजार, कुर्हा, गोतमारा, किन्होळा, सावरगाव जहा, उर्हा, दहीगाव, चिंचपूर या गावांमध्ये स्मशानभूमी बांधकाम व सौंदर्यीकरण, सार्वजनिक सभागृह त्याचप्रमाणे व्यायामशाळा बांधकामाचे भूमिपूजन आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले. गाव तेथे व्यायामशाळा व गाव तेथे स्मशानभूमी हा कार्यक्रम आपण हाती घेतला असून प्रत्येक गावामध्ये ही कामे केली जातील, असे आमदार गायकवाड यांनी सांगितले. या वेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शिवसेना नेते, स्वीय साहाय्यक, उपतालुकाप्रमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक, संबंधित डिपार्टमेंटचे अधिकारी, विभागप्रमुख, पं. स. सदस्य, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी तसेच संबंधित गावांचे ग्रामपंचायत सदस्य व शिवसेना आणि युवासेना कार्यकर्ते-पदाधिकारी उपस्थित हाेते. (वा.प्र.)