२४ लाख रुपयांच्या काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:36 IST2021-02-05T08:36:30+5:302021-02-05T08:36:30+5:30

राजे संभाजी नगरातील रस्ता रखडला हाेता. याविषयी स्थानिक नागरिकांनी शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे यांच्याकडे समस्या मांडली. गजेंद्र दांदडे ...

Bhumi Pujan of concrete road worth Rs. 24 lakhs | २४ लाख रुपयांच्या काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन

२४ लाख रुपयांच्या काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन

राजे संभाजी नगरातील रस्ता रखडला हाेता. याविषयी स्थानिक नागरिकांनी शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे यांच्याकडे समस्या मांडली. गजेंद्र दांदडे यांनी वेळीच समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार संजय गायकवाड यांच्याकडे हा विषय मांडला. त्यावर आमदार गायकवाड यांनी सदर काम मंजूर करून घेतले. या कामाचे भूमिपूजनसुद्धा झाले.

शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांदडे यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले हाेेते. मुन्नाजी बेंडवाल,न.प. उपाध्यक्ष विजय जायभाये, संजय हाडे, नगरसेवक आशिष जाधव, दीपक सोनुने, उमेश कापुरे, मोहन पर्हाड, कैलास माळी, जालुभाऊ भाग्यवंत, कुणाल गायकवाड,सचिन परांडे, ओमसिंग राजपूत, श्रीकांत गायकवाड, बाळासाहेब नारखेडे, गुड्डू येमले, अजय कायस्थ, पुरूषोत्तम हेलगे,गोविंदा खुमकर, दीपक तुपकर ,अविनाश वाघ, गोटू येरमुले, जीवन उबरहंडे, किरण देशपांडे, रवी पाटील, लखन जाधव आदी उपस्थित हाेते. (वा.प्र.)

Web Title: Bhumi Pujan of concrete road worth Rs. 24 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.