शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भीमा कोरेगाव घटना : बुलडाण्यातील खामगावात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 12:59 IST

कोरेगाव-भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ आयोजित महाराष्ट्र बंदला खामगाव येथे बुधवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

खामगाव (बुलडाणा) - कोरेगाव-भीमा घटनेच्या निषेधार्थ आयोजित महाराष्ट्र बंदला खामगाव येथे बुधवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सकाळी 10 वाजता शहरातून शांती मार्च काढण्यात आला असून शहरातील शाळा-महाविद्यालयांसोबतच खासगी प्रवासी वाहतूक धारक बंदमध्ये सहभागी झाले आहेत. एसटीसोबतच खासगी प्रवासी वाहतूकही बंद असल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर एका बसची तोडफोड करण्यात आल्यानंतर सामाजिक संघटनांनी उपविभागीय कार्यालयावर मोर्चा नेत शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. भारिप बहुजन महासंघाचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. 

या पार्श्वभूमीवर बुधवारी पहाटेपासूनच अत्यावश्यक सेवांसोबतच शहरातील शाळा महाविद्यालय, खासगी प्रतिष्ठाने संपूर्णपणे बंद आहे. स्कूल बस संचालकांनीही स्कूल बसेस बंद ठेवल्या तर मंगळवारीरात्रीपासूनच एसटी बसेस बंद असल्याने बस स्थानकावर शांतता आहे. बुधवारी पहाटेपासूनच खामगाव शहरातील पेट्रोलपंपही बंद होते. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी चौका-चौकात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.  

जाणून घ्या काय आहे भीमा-कोरेगाव प्रकरण?

पुणे-नगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं. सोमवारी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.  दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावbuldhanaबुलडाणा