भाऊसाहेब फुंडकरांनी घेतला जि.प. सदस्यांचा वर्ग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:11 IST2017-08-01T00:06:44+5:302017-08-01T00:11:40+5:30

खामगाव : राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुुंडकर यांनी रविवारी जिल्हा परिषद सदस्यांचा वर्ग घेतला.

Bhausaheb Phundkar takes ZP The class of members! | भाऊसाहेब फुंडकरांनी घेतला जि.प. सदस्यांचा वर्ग!

भाऊसाहेब फुंडकरांनी घेतला जि.प. सदस्यांचा वर्ग!

ठळक मुद्देमतदार संघातील समस्या सोडविण्याचे निर्देशप्राधान्याने करावयाच्या कामांकडे लक्ष देण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुुंडकर यांनी रविवारी जिल्हा परिषद सदस्यांचा वर्ग घेतला. यावेळी ना. फुंडकर यांनी सदस्यांना मतदार संघात लक्ष देण्याचे सांगून मतदारांनी आपल्याला कशासाठी निवडून दिले, याची जाणीव ठेवत समस्या सोडविण्याचे निर्देश दिले.
खामगाव विधानसभा मतदार संघातील नऊ जिल्हा परिषद सदस्यांची बैठक ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी रविवार, ३० जुलै रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृहावर घेतली. यावेळी जिल्हा परिषद सदस्यांना मार्गदर्शन करताना फुंडकर यांनी मतदारसंघातील समस्यांकडे दुर्लक्ष करु नये, सांगत जनतेने आपल्याला कशासाठी निवडून दिले, याची जाणीव ठेवण्याचे निर्देश दिले. काही जि.प.सदस्य निवडून आल्यापासून मतदारसंघाकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत, असे होता कामा नये, अशी तंबीच फुंडकरांनी यावेळी दिली.
आपल्या कार्यक्षेत्रात कोणती कामे प्राधान्याने करावयाची आहेत, याची यादी तयार करा. सर्व कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाहीसुद्धा फुंडकरांनी यावेळी दिली. यावेळी आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

मतदारांना विसरणे ही भाजपची संस्कृती नाही!
यावेळी निवडून आल्यापासून वेगळ्याच तोºयात वावरणाºया काही सदस्यांचे कान उपटताना भाऊसाहेब फुंडकर म्हणाले की, मतदारांना विसरणे ही भाजपची संस्कृती नाही. भाजपची कार्यसंस्कृती समजून घेऊन त्या पद्धतीने काम करा, असा सल्ला त्यांनी दिला.

Web Title: Bhausaheb Phundkar takes ZP The class of members!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.