शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींच्या भेटीसाठी कडाक्याच्या थंडीत आदिवासींनी काढली रात्र जागून

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 10:33 IST

Rahul Gandhi, Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांनी अत्यंत नम्रपणे आदिवासी बांधवांच्या स्वागताचा स्वीकार करीत त्यांनी दिलेला धनुष्यबाण स्वीकारत त्यांच्यासोबत बसून संवाद साधला.

- प्रा.नानासाहेब कांडलकरजळगाव जामोद-  खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बुधवार दि.२३ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता महाराष्ट्रातून मध्यप्रदेशकडे प्रयाण करणार असल्याने सातपुडा पर्वतराजित वसलेल्या भिंगारा,चाळीसटापरी व गोमाल या गावातील आदिवासी बांधव,महिला व मुले यांनी महाराष्ट्र व मध्यप्रदेशची सीमा असलेल्या तीनखूटी येथे कडाक्याच्या थंडीत अख्खी रात्र जागून काढली.बुधवारी सकाळी साडेसहा वाजता खा.राहुल गांधी तेथे पोहोचले त्यावेळी सर्व आदिवासी बांधवांनी भारत जोडोचा जयजयकार करत "हम भी आपके साथ है" असा संदेश दिला.

खा.राहुल गांधी यांनी अत्यंत नम्रपणे आदिवासी बांधवांच्या स्वागताचा स्वीकार करीत त्यांनी दिलेला धनुष्यबाण स्वीकारत त्यांच्यासोबत बसून संवाद साधला.विशेष म्हणजे यावेळी आदिवासी बांधवांनी राहुल गांधी यांच्याकडे कोणतीही मागणी केली नाही किंवा साधे निवेदन सुद्धा दिले नाही.आपकी भारत जोडो यात्रा से हम भी एक हो गये एकता का महत्व हमे भी समझा अशी भावना आदिवासींनी यावेळी व्यक्त केली. आदिवासींच्या आरोग्य,शिक्षण व रोजगार याबाबत  असलेल्या समस्यांची जाण आपणास आहे या समस्या दूर करून आदिवासींना सन्मानाचे जीवन कसे जगता येईल यासाठी आपण प्रयत्नरत राहू असा विश्वास खा.राहुल गांधी यांनी आदिवासी बांधवांना यावेळी दिला.माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी आदिवासी बांधवांची भारत जोडो यात्रेप्रति असलेली निष्ठा व त्यांनी कडाक्याच्या थंडीत जागून काढलेली रात्र याविषयी राहुल गांधी यांना ज्ञात केले.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,माजी मंत्री बाळासाहेब थोरात व यशोमती ठाकूर,मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, महाराष्ट्र प्रभारी एस.के.पाटील,आ.प्रणिती शिंदे, प्रदेश सचिव डॉ.स्वाती वाकेकर व रामविजय बुरंगले, प्रकाश पाटील,अविनाश उमरकर,अँड. अमर पाचपोर आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

"झुकना बंद करो" राहुल गांधी यांचा संदेशतीन खुटी येथे आदिवासी बांधवांशी संवाद  साधतांना दोन छोटी मुले राहुल गांधी यांच्या पाया पडत होती.राहुल गांधी यांनी त्यांना विरोध केला आणि म्हटले "झुकना बंद करो,मेरे पैर पडणे की कोई जरूरत नही,सन्मानसे जीओ" अशा प्रकारचा अत्यंत मोलाचा संदेश राहुल गांधी यांनी यावेळी सर्व आदिवासी बांधवांना दिला. 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस